33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeपरभणीशेळ्यांना चार आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे सापडले प्रेत

शेळ्यांना चार आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे सापडले प्रेत

चारठाणा : सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील मीरा हनुमान सातपुते (वय ३८) ही महिला घरातून शेळ्याला चारा आणते म्हणून गेली होती. परंतू ती घरी परत न आल्याने या महिलेचा शोध घरातील मंडळी चार दिवसांपासून घेत होती. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल झाली होती.

चारठाणा पोलिसाकडून तपास सुरू असताना दि.२ डिसेंबर रोजी दुपारी अरुण बोडखे यांच्या शेतात मीरा सातपुते यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळाले. ही माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, देवगाव बीटचे बीट जामदार वसंत वाघमारे, संजय मुंडे, रामकिशन कोंढरे, डीएसबी शाकेचे उमेश बारहाते आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील महिला विजेच्या शाक लागल्याने जागीच ठार झाली. बातमी लिहीपर्यंत चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR