24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम

शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णय कायम

हायकोर्टाचा निवडणुकीत हस्तक्षेपास नकार

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्याप्रमाणे नागपूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड. पंकज शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्याचा निर्णयही कायम ठेवला.

प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे मनीषनगर येथील रहिवासी शंभरकर यांचे नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी २८ मार्च रोजी रद्द केले. परिणामी, शंभरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक निर्णय अधिका-यांनी नोंदविलेले सर्व आक्षेप २७ मार्च रोजीच दूर केले होते. असे असताना नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले. त्यामुळे हा निर्णय अवैध ठरविण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे होते.

याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देऊन शंभरकर यांची याचिका निकाली काढली. तसेच, शंभरकर यांना निवडणूक संपल्यानंतर निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा देण्यात आली. शंभरकरतर्फे अ‍ॅड. राहुल हजारे यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR