18.3 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रबाजारात झेंडू फुलांना मागणी वाढली

बाजारात झेंडू फुलांना मागणी वाढली

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. अन्य फुलांचा भावही वधारला आहे.

नवरात्रोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असल्याने निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही मोठी मागणी असल्याने बाजारात दर दुपटीने वाढले आहेत.

मोठ्या आकारांच्या मूर्ती असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसह, घरगुती पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फुले अधिक प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. दर तेजीत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला.

शेवंतीने भाव खाल्ला
फुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान १०० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत फुलांच्या हारांची किंमत आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गा मातेच्या मूर्तीसाठीच्या हारांचे दर किमान ५०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत आहेत. ४० रुपये किलो मिळणारा झेंडू ८० ते ९० रुपये किलो आहे. मूर्ती पूजनासाठी लाल व पांढ-या फुलांना मागणी असल्याने दीडशे रुपये किलो मिळणारा निशिगंध साडेतीनशेवर व ८० रुपये किलोची शेवंती २२५ रुपयांवर पोहोचली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR