22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘वंचित’ मविआसोबतच राहतील

‘वंचित’ मविआसोबतच राहतील

नागपूर : प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणूक होत आहे. अशात महाविकास आघाडीचे राज्यातले जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही? याबाबतच संभ्रम कायम आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नागपुरात आज पत्रकार परिषद झाली. ‘प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबरच राहतील’ असे भाष्य पटोले यांनी केले.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये किती जागा देणार हा चर्चेचा भाग नाही. आघाडीचे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत आम्ही त्यांना चर्चा बाहेर करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबरच राहतील. यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही ते कळवलं आहे.आज कुठल्याही परिस्थितीत त्यावर मध्यस्थी करून निर्णय घेतील, असं नाना पटोले म्हणाले.
गडकरींनी तापमान वाढवण्याचे काम केले
सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात तापमान वाढवण्याचे काम केले. त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये. नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल, असा सल्ला त्यांना आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. नागपूरची जनता हे सुजाण आहे. नागपूरचा उमेदवार हे स्वत:ला बलाढ्य समजून पंतप्रधानपदाचा उमेदवार मीच असल्याचे २०१४ मध्ये सांगितले. २०१९ मध्ये तेच सांगितले पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचे पावले नरेंद्र मोदी यांनी उचलले. त्या सगळ्याला यांनी समर्थन केल्याने त्या पापाचे वाटेकरी हे आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला.

ही अन्यायाविरोधातील लढाई
नागपुरात भाजप विरोधी परिस्थिती आहे. विदेशात कोणाच काय आहे..चर्चा करायची असेल तर विचारावर चर्चा करावी. भाजपला कशासाठी मतदान करायचं काय. काय त्यांनी महागाई कमी केली. शेतक-यांना न्याय दिला, असं कुठेही चित्र नसताना उलट गरिबी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई अन्याय विरोधात महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही लढाई लढत आहे, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR