सोलापूर : आठ दिवसात उसाची थकीत बिले जमा करा अन्यथा कारखान्यावरती आर आर सी च्या नियमाप्रमाणे कारवाई करणार साखर सह संचालक प्रकाश आष्टेकर यांनी दिल्या दोन्ही कारखान्यांना लेखी नोटिसा पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गेल्या चार महिन्यापूर्वी चालू वर्षी गेलेल्या उसाची थकीत बिले अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत ती बिले त्वरित नियमाप्रमाणे 15 टक्के व्याजासहित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा करकम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती भोसे पाटी येथे शनिवारी १३ जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला होता.
परंतु आंदोलन करण्यापूर्वीच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व साखर सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी दखल घेऊन लेखी ठोस आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित ठेवले असल्याचे पत्रकारांशी बोलताना प्रभाकर भैय्या देशमुख म्हणाले चालू वर्षी 2023 —24 या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस गाळपास जाऊन चार महिने झाले गळीत हंगाम संपून सुद्धा ऊस उत्पादक कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केलेले नाहीत त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
पुढे बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले की उस नियंत्रण कायदा सांगतो की ऊस गाळपास गेल्यानंतर पंधरा दिवसांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाची बिले जमा पाहिजेत अन्यथा 15% व्याज देणं साखर कारखानदारांना बंधनकारक आहे याबाबत सोलापूर विभागाचे साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी तातडीने सहकार शिरोमणी व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला लेखी नोटीस काढून आठ दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले १५ टक्के व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा आर आर सी ची कारवाई करू असे ठोस आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तुर्त स्थगीत करण्यात आले . ट्रॅक्टर ऊस वाहतुकीचेथकित भाड्यासाठी सुद्धा सतत पाठपुरावा करणार आहोत यावेळी जनहितचे जिल्हा संघटक सुरेश नवले जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भाऊ जमदाडे औदुंबर बापू गायकवाड पिनू देशमुख पंढरपूरचा अध्यक्ष सुभाष शेंडगे , रामभाऊ शिरगिरे बालाजी कदम नामदेव तात्या जमदाडे हे उपस्थित होते