24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रचहा न मिळाल्याने डॉक्टरांनी सोडली शस्त्रक्रिया

चहा न मिळाल्याने डॉक्टरांनी सोडली शस्त्रक्रिया

- भूल दिलेल्या महिला ताटकळत - नागपुरातील प्रकार

नागपूर : चहाची सवय लागल्यावर कोण काय करेल सांगता येत नाही. आवडत्या चहाच्या टपरीवर जाणा-यांची संख्याही कमी नाही. मात्र चहासाठी ऑपरेशन अर्धवट सोडणा-या डॉक्टरचा वेगळाच कारनामा समोर आला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. चहा बिस्किट वेळेत न मिळाल्याने डॉक्टर ऑपरेशन न करताच निघाले.

नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे अ‍ॅनेस्थेशिया मिळालेल्या चार महिला रुग्णांचा संताप झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले आहेत.
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्त्रक्रियेस ऐनवेळी नकार देत ग्रामीण भागातील रुग्णालयातून काढता पाय घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या डॉक्टरला चहा बिस्किट न मिळाल्याने त्याने शस्रक्रियेस नकार दिल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात आधीच आरोग्य सुविधांची वानवा असताना डॉक्टरांच्या या असंवेदनशिलतेमुळे गावक-यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

ही घटना जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडली. डॉ. तेजराम भलावे असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील केंद्रात ते कुटुंबनियोजनासाठी आठ महिलांवर शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. पुढे अन्य चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली.

वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ. भलावी प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. या प्रकारावर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुस-याडॉक्टरांची व्यवस्था केली. आपल्याला मधुमेह असून आपल्याला वेळेवर चहा बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने आपल्या रक्तशर्कराचे स्तर खालावले व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण डॉ. भलावी यांनी आपल्या वरिष्ठांना दिल्याचे कळते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR