32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रडॉक्टरने रुग्णाच्या आईला लावली कानशिलात

डॉक्टरने रुग्णाच्या आईला लावली कानशिलात

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलासोबत असलेल्या आईला निवासी डॉक्टरने कानशिलात मारली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ७ वजता घडला. या घटनेनंतर महिलेचे संतप्त नातेवाईक व ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यात तत्काळ चौकशी समिती गठीत करून चौकशी सुरू केली आहे.

श्याम ज्ञानेश्वर तिजारे (३८) हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत असलेल्या वॉर्ड क्रं. २७-२८ मध्ये भरती होता. त्याच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. गुरूवारी सकाळी ७ वाजता वॉर्डमध्ये कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॅ. गौरव जैन आले असता त्यांना लाईफ सपोर्टर मशिनचे बटन बंद दिसले, मशीन बंद केल्याने श्यामची प्रकृती आणखी बिघडली.

बटण कोणी बंद केले याबाबत डॉक्टरने विचारणा केली, यातूनच श्यामच्या आईचा डॉ. गौरव जैन याच्याशी वाद झाला. दरम्यान श्यामची प्रकृती अधिक गंभीर होवून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. गौरव याने आपल्या कानशिलात मारली असा आरोप अन्नपूर्णाबाई यांनी केला. महिलेने ही घटना नातेवाईकांना सांगताच त्यांनी पँथर सेनेच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. डॉक्टरने मारहाण का केली, याचा जाब विचारण्यात आला. कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR