24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरअतुल खुपसे यांच्या कृतीचा काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी केला निषेध

अतुल खुपसे यांच्या कृतीचा काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी केला निषेध

सोलापूर – अध्यक्ष जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांनी पुनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे बेकादेशीररित्या प्रति अधिकारी खुर्चीत बसवून त्यास तोंडास काळे फासून भारतीय चलनी नोटाची उधळपट्टी केली आहे. सदर घटना माध्यमातून प्रसारित होऊन बांधकाम विभागाची व अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन केली आहे. भारतीय चलनी नोटाचा वापर आंदोलनाकरीता चुकीच्या पध्दतीने करुन भारतीय चलन नियमाचा व भारतीय दंड सहिंतेचा भंग केलेला असल्याने अतुल खुपसे यांच्या कृतीचा काळ्या फिती लावून प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी निषेध करीत घोषणाबाजी केली.

सदर घटनेमुळे अधिकारी कर्मचारी यांच्या भावना अत्यंत तीव्र असून, अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करुन अधिकाऱ्यांवर दबाब निर्माण करण्याचा व मानसिक खच्चीकरण करण्याऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी काळया फिती लावून निषेध केला. सात रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवारात निषेध सभा घेवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी अधिकाऱ्यांवर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध असो, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो, बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्याविरुध्द कारवाई करावी, स्टंटबाजीचे आंदोलन करणा याचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर, राजपत्रित अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य, कनिष्ठ अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना यांचे वतीने करण्यात आले. या आंदोलनात वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंतचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फ र्तपणे सहभाग घेतला.

या आंदोलनास महसूल कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, समाज कल्याण कर्मचारी संघटना, सहकार कर्मचारी संघटना, सोलापूर जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संघटनांनी उपस्थित राहून आपला निषेध नोंदविला आहे. या सभेत शंतनु गायकवाड, राजीव साळुंके, अशोक इंदापूरे, श्रीमती. एस.ए. पाटील, कार्यकारी अभियंता, ए.टी. निमकर, कार्यकारी अभियंता, एच. आर. चौगुले, कार्यकारी अभियंता, एम. आर. ठाकरे कार्यकारी अभियंता, आर.एम. जेऊरकर, उपअभियंता, अर्चना आघाव, आर.एस. चंदेले, समीर राऊळ, अमृत कोकाटे, राजेंद्र जमादार, विजयकुमार पोतदार, सुजय वाघचवरे, राजेंद्र जंगम यांनी आपल्या भाषणातून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

यापुढे अशा घटना घडल्या तर तातडीने प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. संजय माळी अधीक्षक अभियंता यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभारल्या बददल आभार व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR