17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रदीड महिन्यात फडणवीस सरकारला तीनवेळा हादरे

दीड महिन्यात फडणवीस सरकारला तीनवेळा हादरे

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण व परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती, ज्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केले होते. यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या दोन प्रकरणावरून राज्य सरकार अडचणीत असतानाच विशेषत: बीड प्रकरण सत्ताधारी मंडळींनी लावून धरल्याने राज्य सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामध्ये आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची भर पडली आहे. यामुळे येत्या काळात सरकारच्या अडचणीत भर पडणार आहे. या निमित्ताने राज्य सरकारला घेरण्याची नामी संधी विरोधकांना मिळाली आहे. त्यामुळे आता येत्या काळात विरोधक या प्रकरणावरून राज्य सरकारची कशाप्रकारे कोंडी करतात याकडे लक्ष लागले आहे.

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षीय चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. १२ व १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने, पाच पोलिसांना दोषी ठरवले आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाने विरोधकाच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

या प्रकरणात अक्षय शिंदेंचे वकील अमित कटारनवरे यांनी केलेलया दाव्यानुसार आम्ही क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणारे न्यायदंडाधिका-यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता.

न्यायदंडाधिका-यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झाले असून ही मर्डरच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केले आहे की यामध्ये एफआयआर झाले पाहिजे. या प्रकरणात न्यायदंडाधिका-याचा रिपोर्ट असताना एफआयआर घेत नसतील तर आम्हाला जे पोलिस अधिकारी एफआयआर घेणार नसेल तर आम्ही पुढची स्टेप घ्यावी लागेल असा दावा अमित कटारनवरे यांनी केला आहे.

अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर प्रकरणास संजय शिंदे (पीआय) निलेश मोरे (उपनिरीक्षक) हरिश तावडे (हवालदार) अभिजीत मोरे (हवालदार) हे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे येत्या काळात या पाच जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR