मराठवाड्यासह विदर्भातील बळीराजाचा आधारवड हरवला; दुष्काळमुक्तीसाठी लढा, शेतक-यांचे पुसले अश्रू

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात भीषण दुष्काळ पडला, अनेक शेतक-यांनी जीवन संपवले. हा संकट मोठे होते. अशावेळी नाना पाटेकर यांचे संवेदनशील मन हेलावले. त्यांनी अभिनेते मकरंद अनासपूरे यांच्या मदतीने नाम फाऊंडेशन उभारले. त्यातून दुष्काळमुक्तीसाठी लढा दिला. बळीराजा त्यांना कधीही विसरणार नाही.

नानांच्या अचानक एक्झिटमुळे अनेकांना मोठा धक्का बसला. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांचा आधारवड हिरावला. केवळ अभिनयापूरते त्यांचे व्यक्तिमत्व मर्यादित नव्हते.. अनेक क्षेत्रात त्यांनी अमिट ठसा उमटवला होता. ते सामाजिक भान जपणारे अभिनेते होते. २०१४-१५ मध्ये मराठवाडा आणि विदर्भावर दुष्काळाचे सावट होते. शेतक-यांच्या आत्महत्येने समाजमन हेलावले. नानांच्या काळीज हेलावले. त्यांनी अभिनेते मकरंद अनासपूरे यांच्या सोबत मिळून ‘नाम’ फाऊंडेशन उभारले. शेतक-यांचे अश्रु पुसण्याचे काम त्यांनी केले. प्रसिद्धीच्या झोतात असतानाही त्यांनी सामाजिक भान जपले. त्यांच्या या कृतीचे कौतुक झाले.

दहा वर्षांपूर्वीच्या दुष्काळात नाम फाऊंडेशनची स्थापन झाली. सप्टेंबर २०१५ मध्ये ही चळवळ सुरू झाली. नाना आणि मकरंद या दोन नावातील अद्याक्षरं घेऊन ‘नाम’ फाऊंडेशन शेतक-यांच्या मदतीला उतरले. मराठवाडा आणि विदर्भातील भीषण दुष्काळाने अनेकांचे सर्वस्व हिरावले होते. शेतकरी आत्महत्येचा डाग प्रगतशील आणि पुरोगामी महाराष्ट्रावर लागलेला होता. शेतक-यांच्या विधवांच्या, मुलांच्या हार्त हाकेला नाम फाऊंडेशनने मदत केली. पण केवळ आर्थिक मदतीपुरती ही चळवळ मर्यादित राहिली नाही.

पाणी संवर्धन, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी व्यवस्थापन, शेतकरी मार्गदर्शन, विविध पाणी प्रकल्पांवर काम, महिलांना स्वत:च्या पायावर उभा राहता यावे यासाठीचा प्रयत्न आणि मुलांना चांगले शिक्षण मिळवून देण्यासाठी नाम झटली आणि हे काम सुरू आहे. नाम ही केवळ एक संस्था न राहता चळवळ झाली. नाना पाटेकर यांनी या काळात मराठवाड्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. विदर्भातील यवतमाळमध्ये ते गेले. त्यांनी अनेक मुलाखतीत हे विदारक चित्र मांडले आणि थेट मदत करण्याचे आवाहन केले.

लाखो शेतक-यांना ‘नाम’चा आधार
‘नाम’ फाऊंडेशनच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ७७,१७,००० लाख शेतक-यांना या संस्थेने मदत केली आहे. ५०,९०८ कुटुंबांना मदत केली. तर वीरगती प्राप्त लष्करी जवानांच्या १०२ कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. ४,९५७ विधवांना या फाऊंडेशनने मदत केली आहे. राज्यातील २१८७ गावांपर्यंत नाम फाऊंडेशन पोहचले आहे. यामुळे १,२७,२३,१२६ कोटी लोकांना पाण्याची सोय होण्यासाठी मदत झाल्याचे या संकेतस्थळावर म्हटले आहे.

आजही दुष्काळाचे सावट, पण काळाने नानांना हिरावले
सुपर अल निनोमुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट उभे ठाकले आहेत. ऐन हिवाळ्यातच पाणवठे आटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच तालुके भीषण दुष्काळाचे चटके सहन करत आहेत. अशावेळी अनेकांना नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची आठवण झाली आहे. पण काळाने नानांना आपल्यातून हिरावले आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक कुटुंब पोरकी झाली आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news