26.1 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeराष्ट्रीयशनिवारी होणार पश्चिम बंगालमधील ७८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

शनिवारी होणार पश्चिम बंगालमधील ७८ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

कोलकाता : देशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या आठ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शनिवारी ज्या आठ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे त्यात बांकुरा, बिष्णुपूर, पुरुलिया, कांठी, तमलूक, मेदिनीपूर, घाटल आणि झारग्राम यांचा समावेश आहे.

या टप्प्यात ज्या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे त्यात कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि तमलूकमधील भाजपचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय, घाटल येथील दोन सेलिब्रिटी उमेदवार, तृणमूल काँग्रेसचे दीपक अधिकारी ऊर्फ ​​देव आणि भाजपचे हिरण चॅटर्जी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, प्रमुख उमेदवारांमध्ये मेदिनीपूरमधील टीएमसी उमेदवार जून मालिया आणि भाजपमधील त्यांचे प्रतिस्पर्धी, फॅशन डिझायनर-राजकारणी अग्निमित्रा पॉल यांचा समावेश आहे.

७९ उमेदवारांमध्ये, बांकुरा आणि झारग्राममधील प्रत्येकी १३ सर्वाधिक उमेदवार आहेत, त्यानंतर पुरुलियामधील १२, मेदिनीपूर, कांठी आणि तमलूकमधील प्रत्येकी ९ आणि घाटल आणि विष्णुपूरमधील प्रत्येकी ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, बांकुरा, विष्णुपूर, पुरुलिया, मेदिनीपूर आणि झारग्राम या पाच मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडून आले. तर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी कांठी, तमलूक आणि घाटल मतदारसंघात विजय मिळवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी मतदान शांततेत पार पडावे यासाठी सीएपीएफच्या एकूण १,०२० तुकड्या पश्चिम बंगालमध्ये तैनात केल्या जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR