22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयफिल्मी स्टाईलने बिडी पेटवणे भोवले; क्षणात बाईक, दुकाने झाली जळून खाक

फिल्मी स्टाईलने बिडी पेटवणे भोवले; क्षणात बाईक, दुकाने झाली जळून खाक

अनंतपूर : धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक असण्यासोबत त्याच्या सेवनावेळी निष्काळजीपणे असे करणे अधिक धोकादायक आणि घातक ठरू शकते. याचाच प्रत्यय आंध्र प्रदेशात आला आहे. या घटनेचा व्हीडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चहा किंवा पानाच्या दुकानात लोक अनेकदा बिडी आणि सिगारेट ओढताना दिसतात. या व्हीडीओमध्येही असेच काहीसे घडले. पण बिडी पेटवल्यानंतर एका माचिसच्या काडीने दोन बाईकसह अनेक दुकानांचा कोळसा केला आहे. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील कल्याणदुर्गम शहरात सकाळच्या सुमारास घडली. एका व्यक्तीने धुम्रपान करताना अनेक दुकानं आगीत जाळून खाक करुन टाकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र लोकांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हीडीओमध्ये दोन लोक दुकानाजवळ उभे राहून बोलत असल्याचे दिसत आहे. तिथे एक स्कूटर आणि एक बाईकही उभी केलेली दिसते. दोघेजण आरामात उभे राहून गप्पा मारण्यात व्यस्त होते. मात्र काही सेकंदात तिथले दृश्य बदलले. बोलत असतानाच एका व्यक्तीने धूम्रपान करण्यासाठी विडी काढली. त्यानंतर विडी पेटवल्यानंतर त्याने माचीसची काडी ओल्या जमिनीवर फेकली. पण ही जमीन पाण्यामुळे नाही तर पेट्रोलमुळे ओली झाली होती. हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही.

माचिसची जळणारी काडी जमिनीवर पडताच तिथे मोठी आग लागली आणि आग लगेचच दोन्ही बाईक आणि दुकानापर्यंत पोहोचली. आगीनंतर लोक घटनास्थळावरून पळायला लागले. बघता बघता आगीत काही दुकानेही खाक झाली. एका व्यक्तीने पाच लिटर पेट्रोल विकत घेतले होते. पण तो दुचाकीवरून जात असताना कंटेनरमधून त्याची रस्त्यावर गळती झाली. रस्त्यावर अनेक दुकाने असणा-या ठिकाणीच ही गळती झाली होती. तिथेच बिडी पिणा-या व्यक्तीने माचिसची काडी फेकली. दरम्यान, स्थानिक लोकांनी शहाणपणा दाखवत हे प्रकरण तातडीने हाताळण्याचा प्रयत्न केला. जीवित वा वित्तहानी होण्याआधीच लोक पाणी, वाळू घेऊन धावू लागले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR