28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजन‘शैतान’ चित्रपटातील आर माधवनचा फर्स्ट लूक आला समोर

‘शैतान’ चित्रपटातील आर माधवनचा फर्स्ट लूक आला समोर

मुंबई : अभिनेता आर माधवन त्याच्या आगामी ‘शैतान’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोमवारी शैतान चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटातील अभिनेत्री ज्योतिकाचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. तर आज निर्मात्यांनी शैतानमधील आर माधवनचा फर्स्ट लुक रिलीज केला असून तो सोशल मीडियावरही शेअर केला आहे, ज्यामध्ये आर माधवन आपल्या दमदार लूकमध्ये दिसत आहे. आर माधवनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शैतान चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

माधवनने पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये त्याच्या निळ्या डोळ्यांना काजळ लावलेले दिसत असून ,त्याच्या कपाळावर आणि नाकावर जखमा झालेल्या दिसत असून, याअगोदर त्याला अशा भयानक रुपात कधीच पाहिले नाही. त्याचे पोस्टर शेअर करताना लिहिले की, मी सैतान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर माधवन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

शैतानमध्ये अजय देवगण सोबत ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्योतिका शैतान चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. डोली सजा के रखना या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिदीर्ला सुरुवात केली होती त्यानंतर तिने तामिळ इंडस्ट्रीत प्रवेश केला. शैतान हा एक थ्रिलर चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR