24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअन्नदात्याने ताकद दाखवावी; शिवसेना पाठीशी

अन्नदात्याने ताकद दाखवावी; शिवसेना पाठीशी

मुंबई : दुष्काळ आणि पीकविमा न मिळाल्याने हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याची जाहिरात दिली होती. बँकांचे पीक कर्ज फेडण्यासाठी आपले किडनी डोळे, लिव्हर असे अवयव विक्रीला काढले होते. मुंबईमध्ये या शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलनही केले. शुक्रवार, १ डिसेंबर रोजी या शेतकऱ्यांनी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणले की, हे सरकार सगळच विकत आहे, या सरकारच करायच तरी काय? अन्नदात्याने त्यांची ताकद दाखवावी शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे.

जे शेतकरी मातोश्रीवर येऊन गेले त्यांना अटक झाल्याच समजले. त्यांचा काय गुन्हा होता, का अटक केली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ही शेतकऱ्यांची खरी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते. स्वतः चे राज्य सोडून दुसऱ्याची धुणी धुवायला गेले. अशा सरकारला नालायक म्हटल तर मिरच्या झोंबल्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच शिवसेनेचे नेते जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पीक वीम्याचा जाब विचारणार आहेत. वीमा कंपन्याची कार्यालय बंद आहेत. पैसा नेमका गेला कुठे? १ रूपयात पीक विमा देणार होते. सरसकट नुकसान भरपाई द्या, अन्यथा कर्जमुक्ती द्या, अशी मागणीही ठाकरेंनी यावेळी केली. पण आत्महत्या, अवयव विक्रीचा विचार करु नका, खचून जाऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे, असे म्हणत प्रधानमंत्री फसल योजना हा एक घोटाळा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR