जालना : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा अंतरवाली सराटी गावात १७ डिसेंबर रोजी ठरवली जाणार होती. मात्र, याबाबतचा निर्णय आता म्हणून मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात २३ डिसेंबर रोजी होणा-या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील जरांगे म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजच सांगितल्यास सरकारला कळून जाईल.
आता मराठा समाजाला परत येऊ द्यायचे नाही. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढायची. उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचे ते म्हणतील. त्यामुळे बीड येथील २३ डिसेंबर रोजी होणा-या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.