22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरदोघांचे फोटो आई-वडिलांना दाखवतो असे सांगून मुलीवर दुष्कर्म

दोघांचे फोटो आई-वडिलांना दाखवतो असे सांगून मुलीवर दुष्कर्म

सोलापूर – व्हॉट्सअ‍ॅपवरून ओळख झालेल्या मित्राने दोघांचे फोटो आई- वडिलांना दाखवतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर वारंवार दुष्कर्म केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कौलगी (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी बारावीमध्ये शिकत असताना ती कोचिंग क्लासेसला जात होती. दरम्यान, कोचिंग क्लासेसच्या बाहेर आरोपी सचिन हा अधूनमधून येत होता. एके दिवशी त्याने तिच्या ≡ मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर हाय असा मेसेज केला.

त्यावेळी त्याला तिने रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांचे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू होऊन दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर ते दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते. मे २०२३ मध्ये सचिनने तिला फोन करून उद्या आपल्या दोघांना कॅफेमध्ये जायचे आहे, असे सांगून तिला कॅफेमध्ये नेले. तेथे कॉपी प्यायल्यानंतर दोघांनी फोटो काढले. थोड्या दिवसांनी त्याने ते फोटो पीडितेच्या आई-वडिलांना दाखवतो अशी धमकी दिली. त्यावेळी तिने त्याला भीतीपोटी ते फोटो घरच्यांना दाखवू नको असे सांगितले असता त्याने मी जे सांगेन ते ऐक अशी धमकी दिली आणि कॉलेज सुटल्यानंतर ती घरी जात असताना तो कॉलेजच्या गेटवर दुचाकी घेऊन आला.

त्याने तिला कॅफे हाऊसमध्ये नेले व तिला धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतरही त्याने सात ते आठ वेळा त्या कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर दुष्कर्म केले आणि तो व्हिडिओ त्याने मोबाइलमध्ये काढला होता. ते फोटो व दोघांमधील शरीरसंबंधाचा व्हिडिओ पीडितेच्या भावाने पाहिला. तेव्हा तिने सर्व हकीगत कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी धीर देऊन आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR