लातूर : तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विलास भवन या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास समारंभ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी मंत्री तथा सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे जी, माजी मंत्री सतेज पाटील जी, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, कल्याणराव काळे, माजी आमदार धनाजीराव साठे, आमदार राजेश राठोड, आमदार अभिजित वंजारी, आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार दिनकरराव माने, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह देशमुख कुटुंबीय, मांजरा परिवारातील सदस्य आणि असंख्य लातूरकर यावेळी उपस्थित होते.