परभणीत महा मूक मोर्चा ठरला लक्षवेधी

परभणी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणा-या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी शनिवार दि. ४ जानेवारी रोजी परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सकल मराठा समाज व अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मूक मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणा-या सर्व आरोपींना तातडीने अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी शनिवारी परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मूक मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेसह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला.

या मूक मोर्चात मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योतीताई मेटे, खा. संजय जाधव, माजी आ. सुरेशराव वरपुडकर, माजी आ. सुरेश देशमुख, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. ऍड. विजयराव गव्हाणे, आ. राजेश विटेकर आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा मूक मोर्चा महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, नारायण चाळमार्गे महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात पोहोचला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मूक मोर्चात स्व. देशमुख यांच्या मातोश्री, बंधू, बहिण, मुलगी व मुलगा सहभागी झाले होते. कुटुंबियांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चा दरम्यान ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आकाच्या आकाची बारी : आ. धस
आ. धस म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणी सभागृहात आयजी लेव्हलच्या अधिका-याच्या अधिपत्याखाली एसआयटी दाखल झाली पाहीजे अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. तसेच न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. कारण चुकून एखादा पोलिसांकडून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहीजे. संतोष यांच्या मारहाणीचा व्हीडीओ आकाला दाखवलाच असेल आणि आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी तो पाहिला असेल तर आकाचे आका करलो जल्दी तयारी अब है… असे म्हणत आ. धस यांनी कुणाचेही नाव न घेतो निर्वाणीचा इशारा दिला.

ही वादळापूर्वीची शांतता : जरांगे
मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला डिवचू नका आम्ही जो पर्यंत शांत आहोत शांत राहू द्या अन्यथा रस्त्यावर उतरू. वादळापुवीर्ची ही शांतता आहे. हलक्यात घेवू नका. गुन्हेगारांना शासनातील मंत्री पाठीशी घालत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. बीड व परळी हा बिहार पेक्षा जास्त गतीने गुन्हेगारीत पुढे जात आहे. या ठिकाणी दादागिरी मोठया प्रमाणात वाढली आहे. वाळू माफीया, राख माफीया मोठया प्रमाणात आहेत. राजकीय दबावाखाली चार्जशीट दाखल करण्यात येऊ नये. दादागीरी एवढी वाढली की लोक पलायन करून जात आहेत. यांच्या पापाचा घडा भरला आहे. ना. धनंजय मुंढे यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना केले.

परळी अन्यायाचे केंद्र : खा. जाधव
खा. संजय जाधव यांनी, माणुसकीचा खून करण्याचे काम आमच्या शिवशेजारच्यांनी केले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांना आता न्याय हवा आहे. तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही. सरकारने दखल घेतली पाहिजे. ही वादळापूर्वीची शांतता आहे, परळी क्रौर्य आणि अन्यायाचे केंद्र बनले आहे. कोणतेही नियम, कायदे तिथले काही लोक मानत नाहीत. पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी सोडली गेली आहे. त्यामुळे या मंडळींना मोकाट सोडून चालणार नाही, असे ते म्हणाले.

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : आ. विटेकर
आ. राजेश विटेकर यांनी माणुसकीला काळीमा फासणा-या मस्साजोग येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली.

देशमुख यांचा आत्मा टाहो फोडतोय : आ. पाटील
आ. डॉ. राहुल पाटील यांनी देशमुख यांचा आत्मा टाहो फोडून न्याय मागतोय. गुन्हेगारांना फाशी द्या अशी आर्त हाक आहे. कालच्या अधिवेशनात विधानसभेत आपण या प्रकरणात आवाज उठवला. परंतु न्याय मिळेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असाही इशारा आ. पाटील यांनी दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16

Latest news