22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयकर्नाटकात ‘मंकी फिव्हर’चा कहर; दोघांचा मृत्यू

कर्नाटकात ‘मंकी फिव्हर’चा कहर; दोघांचा मृत्यू

बंगळुरू : महाराष्ट्राचा शेजारी असलेल्या कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या फिव्हरची लागण ४९ जणांना झाली आहे. उत्तर कन्नड जिल्हा बेळगावच्या शेजारी आहे. बेळगावची सीमा महाराष्ट्राला लागून आहे.

मंकी फिव्हरचा वाढता कहर पाहता आरोग्य विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. मंकी फिव्हरपासून बचाव करण्यासाठी तयारी सुरू आहे. मंकी फिव्हर म्हणजेच क्यासानूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी) प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचतो. माकडांच्या माध्यमातून माणसांच्या संपर्कात येणा-या ढेकणांमधून मंकी फिव्हरचा फैलाव होतो. १९५७ मध्ये पहिल्यांदा हा आजार ओळखण्यात यश आले. अनेक माकडांमुळे याचा मृत्यू झाल्याने त्याला मंकी फिव्हर म्हटले गेले.

महाराष्ट्राला किती धोका
कर्नाटकातील पश्चिम घाट परिसरात सुरुवातीला मंकी फिव्हरचे रुग्ण आढळून आले. गेल्या दशकभरात या आजाराचे रुग्ण वाढले. पश्चिम घाट शेजारच्या राज्यांमध्येही मंकी फिव्हरचे रुग्ण आढळले. त्यात केरळ, महाराष्ट्राचा समावेश असल्याचे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे संक्रामक आजार विभागाच्या सल्लागार असलेले डॉ. लक्ष्मण जेस्सानी यांनी सांगितले.

कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात मंकी फिव्हरचे ३१ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी मंकी फिव्हर पसरलेल्या भागांमध्ये आवश्यक पावलं उचलण्याची गरज असल्याचे जेस्सानी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR