22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयअरबी समुद्रात कोसळले हेलिकॉप्टर

अरबी समुद्रात कोसळले हेलिकॉप्टर

३ क्रू सदस्य बेपत्ता, शोधमोहीम सुरू

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदरच्या किनारपट्टीवर बचाव मोहिमेदरम्यान अरबी समुद्रात कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधील तीन क्रू मेंबर बेपत्ता झाले असून, एकाची सुटका करण्यात आली तर बेपत्ता तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा समुद्रात कोसळलेल्या हेलिकॉप्टरला बचाव मोहिमेदरम्यान इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यावेळी हार्ड लँडिंग झाल्याने ही दुर्घटना घडली.

गुजरातमधील पोरबंदरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘हरी लीला’ या मोटार टँकरवरील जखमी क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. चार क्रू मेंबर्स असलेल्या एएलएच हेलिकॉप्टरला समुद्रात इमर्जन्सी हार्ड लँडिंग करावे लागले. त्यावेळी ते समुद्रात पडले. या हेलिकॉप्टरमध्ये ४ कू्र मेंबर होते. त्यातील एका क्रू मेंबरला शोधण्यात यश आले तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. हेलिकॉप्टरचे लोकेशन सापडले आहे. या बचाव कार्यासाठी, बेपत्ता कर्मचा-यांच्या शोधासाठी ४ जहाजे आणि २ विमाने परिसरात तैनात केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR