22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयमाल्टाच्या जहाजाचे अपहरण; भारतीय युद्धनौका रवाना

माल्टाच्या जहाजाचे अपहरण; भारतीय युद्धनौका रवाना

नवी दिल्ली : एडनच्या आखातात माल्टा जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने आपली एक युद्धनौका मदतीसाठी पाठवली आहे. माल्टीज जहाज एमव्ही रौनने गुरुवारी युनायटेड किंगडम मरीन ट्रेड ऑपरेशन्सला (यूकेएमटीओ) सहा अज्ञात लोक जहाजावर चढल्यानंतर आपत्कालीन संदेश पाठविला होता. त्यानंतर भारतीय नौदलाने ‘मिशन डिप्लॉयड’ अंतर्गत १८ क्रू सदस्यांसह एक युद्धनौका तेथे मदतीसाठी पाठवली आहे.

अरबी समुद्रात अपहरण झालेल्या माल्टा या व्यावसायिक जहाजाच्या सुटकेसाठी भारतीय नौदल पुढे आले आहे. इशारा मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने ताबडतोब आपल्या युद्धनौकेला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. माल्टाच्या मदतीसाठी भारतीय नौदलाचे सागरी गस्ती विमान आणि चाचेगिरी विरोधी गस्तीवर तैनात असलेली युद्धनौका तातडीने वळवण्यात आली आहे.

भारताने पाठवलेले गस्ती विमान शुक्रवारी सकाळी अपहरण केलेल्या जहाजापर्यंत पोहोचले आणि त्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आता ते जहाज सोमालियाच्या किनाऱ्याकडे निघाले आहे. एडनच्या आखातात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजानेही त्या जहाजाची ओळख पटवली आहे.

भारतीय नौदलाने एका निवेदनात शनिवारी म्हटले की, नौदलाच्या युद्धनौकेने अपहरण करण्यात आलेले जहाज शोधून काढले असून आम्ही त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. एमव्ही रून हे जहाज सोमालियाच्या दिशेने जात असताना गुरुवारी हल्ला झाला. यूके सागरी व्यापार प्रशासनाने सांगितले की, क्रूचे जहाजावरील नियंत्रण सुटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR