नयागड : ओडिशातील नयागड येथे अनैतिक संबंधामुळे संतप्त पतीने पत्नीची हत्या केली. हत्या करुनही त्याचा राग शांत झाला नाही. त्यानंतर त्याने पत्नीचे डोके घेऊन संपूर्ण परिसरात फेरफटका मारला आणि कापलेले डोके घेऊन पोलिस ठाणे गाठले. तरुणाने स्वत: सगळी हकीकत पोलिसांना सांगितली आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या तरुणाला हत्येप्रकरणी अटक केली. तरुणाच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
आरोपी तरुण हा ओडिशातील नयागड जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी अर्जुन बाघा ३५ वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीचे दुस-या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे दोघांमध्ये खटकेही उडायचे. गेले काही दिवस दोघांमध्ये सतत खडाजंगी सुरु होती. पत्नीच्या या कृत्याचा राग येऊन त्याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. आणि तिचे कापलेले डोके घेऊन तो संपूर्ण परिसरात फिरला. तरुणाचे हे कृत्य पाहून परिसरात घबराटीचे वातावरण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.