लहान मुलांमध्ये हाडे तुटण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : पावसामुळे ओले झालेले खेळाचे मैदान, निसरडे मजले, जिने, चिखल आणि ब-याचदा खड्डे न दिसल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. धावणे, उड्या मारणे, सायकल चालवणे आणि खेळणे यामुळे पावसाळ्यात मुलांमधील फ्रॅक्चरची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. प्रौढांच्या तुलनेत मुलांची हाडे अजून वाढीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या हाडांमध्ये ‘ग्रोथ प्लेट’ (हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचा भाग) असल्याने ती अधिक लवचिक असतात. त्यामुळे हाडे सहज तुटत नसली, तरी मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची फ्रॅक्चर आढळतात.

यामध्ये ‘ग्रीनस्टिक फ्रॅक्चर’, ‘बकल (टोरस) फ्रॅक्चर’ आणि ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचा समावेश होतो. विशेषत: ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार न झाल्यास भविष्यात हाडांच्या वाढीवर आणि त्यांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात पुण्यातील औंधच्या अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन रुग्णालयात बाल अस्थिरोगतज्ज्ञ असणा-या डॉ. सुशांत श्रीवास्तव यांनी याविषयी मार्गदर्शन केले आहे. पावसाळ्यातील बहुतांश फ्रॅक्चर ही किरकोळ पडल्यामुळे होतात. शाळेतील ओल्या कॉरिडॉरमध्ये धावताना घसरणे, पावसाने ओल्या झालेल्या मैदानावर घसरुन पडणे, निसरड्या रस्त्यावर सायकल चालवताना तोल जाणे किंवा जिन्यावरून पडणे ही त्यामागील सामान्य कारणे आहेत. अशा दुखापतींमध्ये मनगट, हाताचा पुढील भाग (फोरआर्म), कोपर, घोटा, पाय आणि कॉलर बोन (हंसलीचे हाड) या भागांना सर्वाधिक इजा होण्याची शक्यता असते.

फ्रॅक्चरची लक्षणे काय?
मुलांमधीस फ्रॅक्चरची लक्षणे पालकांनी त्वरित ओळखणे गरजेचे आहे. दुखापतीच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, सूज येणे, स्पर्श केल्यावर दुखणे, तो भाग निळसर पडणे, हात किंवा पायाचा वापर करण्यास टाळणे, चालताना त्रास होणे, हाडाचा आकार बदलल्यासारखे दिसणे किंवा लहान मुले दुखापत झालेल्या भागाला हात लावताच रडू लागतात. ही फ्रॅक्चरची महत्त्वाची लक्षणं असून काही वेळा बकल किंवा न हललेल्या (नॉन-डिस्प्लेस्ड) फ्रॅक्चरमध्ये बाहेरून कोणतीही विकृती दिसत नाही, मात्र तीव्र वेदना आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

काय करावे, काय करू नये?
फ्रॅक्चरचा संशय आल्यास योग्यवेळीच प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. दुखापत झालेला हात किंवा पाय शक्य तितका स्थिर ठेवावा आणि त्याची अनावश्यक हालचाल टाळावी. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी कापडात गुंडाळलेला बर्फाचा शेक १५ ते २० मिनिटे देता येतो. मात्र, वाकलेले हाड सरळ करण्याचा प्रयत्न करू नये किंवा दुखापत झालेल्या भागाला मालिश करू नये. अशा वेळी तातडीने बाल अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या आपत्कालीन विभागात मुलाला दाखल करावे. बहुतांश वेळा शारीरिक तपासणी आणि एक्स-रेच्या मदतीने फ्रॅक्चरचे निदान करता येते. काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अतिरिक्त तपासण्यांची आवश्यकता भासू शकते.

काय आहेत उपचार ?
फ्रॅक्चरचा प्रकार, मुलाचे वय, दुखापतीचे ठिकाण आणि ग्रोथ प्लेटचा सहभाग यानुसार उपचार निश्चित केले जातात. लहान मुलांमध्ये हाडं लवकर भरून येण्याची क्षमता अधिक असल्याने अनेक फ्रॅक्चरवर प्लास्टर किंवा स्प्लिंट लावून यशस्वी उपचार करता येतात. मात्र, हाडांचे विस्थापन झाले असल्यास, सांध्याजवळील किंवा ग्रोथ प्लेटशी संबंधित गंभीर फ्रॅक्चर असल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. उपचारानंतर नियमित तपासणी करून हाड योग्य पद्धतीने जुळत आहे का, तसेच भविष्यात वाढीशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही ना, याची खात्री करणे आवश्यक असते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news