21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकलिंगडाची आवक वाढली

कलिंगडाची आवक वाढली

जालना : राज्यभरात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे नागरिकांची रसवंती, ज्यूस सेंटर आदींकडे पावले वळाली आहेत. तसेच उन्हाळ्याची चाहूल लागताच जालना जिल्ह्यातील शहागड (ता. अंबड) येथील बाजारपेठेत कलिंगडाची आवक देखील वाढली आहे.वाढलेला उन्हाळा, रमजानचा महिना यामुळे कलिंगडाला मागणीही वाढली आहे. किरकोळ बाजारात एका कलिंगडाचे दर आकारानुसार २० ते १५० रुपयांपर्यंत आहेत.

सरबत विक्रेत्यांकडून देखील कलिंगडाला मागणी वाढली आहे. तसेच मंगळवारपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून, रमजान महिन्यात कलिंगडाच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसते आहे.

कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर आवक आणखी वाढेल. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. त्यामुळे फळ विक्रेते, तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी असते. घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे, निफाड, बीबीशकूर या जातीचे कलिंगड खरेदी करतात. कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सुरू झाला असून, जून महिन्यापर्यंत असतो.

जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरील अंबड व घनसावंगी तालुक्यातील असंख्य शेतक-यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. त्यामुळे मागणीनुसार कलिंगड अंबड, घनसावंगी तालुक्यातच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च व इतर खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे यंदा कलिंगडाचे भाव देखील आवाक्यात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR