24.1 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निकाली

एसटी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निकाली

दिवाळीसाठी महामंडळाची मोठी घोषणा

मुंबई : एकीकडे एसटी कर्मचा-यांनी १३ ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे बिगुल फुंकले असतानाच आता एसटी कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. एसटी कर्मचा-यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी काल राज्य शासनाने ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास मंजूरी दिली आहे. त्यातच आता दिपावली सणासाठी आता सण उत्सव अग्रीम उचल देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने आपल्या विविध देण्यांसाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्यातच काल राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचा-यांचा सप्टेंबरचा पगार वेळेत व्हावा यासाठी ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास गृहविभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीच्या ८३ हजार कर्मचा-यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे. आता एसटी कर्मचा-यांना दिवाळीचा सण तोंडावर आल्याने ऊत्सव अग्रीम उचल मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

या वर्षाचा दिपावली हा सण दि. २१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या कर्मचा-यांची रु. १२,५००/- उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे. त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचा-यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यन्त या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR