26.7 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रकबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी!

कबरीचा मुद्दा दिल्ली दरबारी!

उपमुख्यमंत्री शिंदे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार

मुंबई : प्रतिनिधी
सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ््या संस्था, संघटनांकडून केली जात आहे. राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या कबरीचा मुद्दा थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौ-यावर जाणार आहेत. या दिल्लीवारीत ते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केंद्रीय नेतृत्त्वाकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना शिंदे यांच्या या दिल्लीवारीला चांगलेच महत्त्व आले आहे.

खरे म्हणजे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ््यात सहभागी होणार आहेत. या सोहळ््याला हजेरी लावल्यानंतर ते दिल्लीतील नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता आहे. याच भेटीत ते महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR