24 C
Latur
Saturday, July 5, 2025
Homeमनोरंजनप्रवास दे संपणारा, नको संपवणारा

प्रवास दे संपणारा, नको संपवणारा

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संकर्षणची पोस्ट थेट परमेश्वरालाच सवाल

मुंबई : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ हे विमान उड्डाण घेताच काही क्षणातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. अहमदाबादवरुन हे विमान लंडनला जात होते. या विमानात २४२ प्रवासी होते. या भीषण अपघाताने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

या विमान अपघातानंतर मराठी अभिनेता संकर्षण क-हाडेने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. या पोस्टमधून संकर्षणने थेट परमेश्वरालाच सवाल केला आहे. तू सांग ईश्वरा, मी स्वप्न पाहू नको? उडायचे स्वप्न माझे, मग हवेत जाऊ नको? असा कसा तू स्वप्न दाऊनी, देत नाही थारा? प्रवास दे संपणारा, नको संपवणारा…!!! असे संकर्षणने पोस्टमध्ये म्हटले आहे. खूप दु:ख झालंय मनाला, ईश्वरा सांभाळ बाबा असे कॅप्शन त्याने दिले आहे.

दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांनी आपला जीव गमावला. तर केवळ एका प्रवाशाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या अपघातात विमान प्रवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २४२ प्रवासी होते, त्यापैकी १६९ भारतीय, ७३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. त्यांच्यासोबत ज्या ठिकाणी हे विमान कोसळले तिथल्या २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR