नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ््याचे आयोजन करण्यात आले असून, आज झालेल्या बैठकीत कुंभमेळ््याच्या पर्वापासून शाही स्नानापर्यंत तारखा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होणार असून, दुपारी १२ वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडणार आहे. तसेच साधुग्राममध्ये २४ जुलै २०२७ रोजी आखाडा ध्वजारोहण होणार असून २४ जुलै २०२८ पर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. यासोबतच सिंहस्थ कुंभमेळ््यातील शाही स्रानाच्या तारखाही जाहीर केल्या असून, २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्रान होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ््याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे उपस्थित होते. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ््यातील अमृत स्रान, शाही स्रानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार २९ जुलै २०२७ रोजी नगर प्रदक्षिणा होईल तर पहिले अमृतस्नान हे सोमवार, दि. २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले शाही स्रान होणार आहे. यासोबतच दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. तिसरे आणि शेवटचं अमृतस्रान हे ११ सप्टेंबर २०२७ रोजी नाशिक येथे आणि २४ जुलै २०२८ रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याचा ध्वज खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील, असे सांगण्यात आले.