32.9 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeराष्ट्रीयशेवटचे अमृतस्नान; भाविकांवर पुष्पवृष्टी

शेवटचे अमृतस्नान; भाविकांवर पुष्पवृष्टी

प्रयागराज : सोमवारी, महाकुंभाच्या शेवटच्या अमृतस्रानाच्या दिवशी, संगम तीरावर स्रान करण्यासाठी आलेल्या करोडो भाविकांवर सरकारने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टरमधून सर्व घाट आणि आखाड्यांवर स्रान करताना भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सकाळी ६.३० वाजता आखाड्यांचे अमृतस्रान सुरू असतानाच पुष्पवृष्टी सुरू झाली. गुलाबाच्या पाकळ्यांचा पाऊस पाहून संगमाच्या काठावर उपस्थित नागा तपस्वी, संत आणि भाविक भारावून गेले आणि त्यांनी जय श्री राम आणि हर हर महादेवच्या घोषणा दिल्या. गुलाबाच्या पाकळ्यांची विशेषत व्यवस्था करण्यात आली योगी सरकारच्या सूचनेवरून उद्यान विभागातर्फे महाकुंभमेळा परिसरात स्रान उत्सवानिमित्त भाविकांवर पुष्पवृष्टी करण्याची अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची खास व्यवस्था करण्यात आली होती.

महाकुंभातील सर्व स्रान उत्सवांवर पुष्पवृष्टी करण्याची तयारी करण्यात आली आहे.
२० क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी प्रत्येक स्रानाच्या उत्सवात सुमारे २० क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली. पौष पौर्णिमा आणि मकर संक्रांतीच्या पहिल्या अमृतस्रानाच्या सणावर भाविकांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला, तर मौनी अमावस्येच्या दुस-या अमृतस्रानालाही प्रतीकात्मक पुष्पवृष्टी करण्यात आली.

५ क्विंटल फुलेही राखीव ठेवण्यात आली होती अमृतस्रानादरम्यान नागा भिक्षू, संत आणि भाविकही पुष्पवृष्टीने भारावून गेलेले दिसले. हर हर महादेव, जय श्री राम, गंगा मैया की जय अशा घोषणांनी संपूर्ण त्रिवेणी परिसर दुमदुमून गेला. प्रयागराज उद्यान विभागाने अमृत स्रानासाठी पुरेशा फुलांची व्यवस्था केल्याची माहिती आहे. २० क्विंटलपेक्षा जास्त गुलाब फुलांचा साठा उद्यान विभागात जमा करण्यात आला. ५ किवंटल फुलेही राखीव ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR