26.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांना मिळणार अधिकचे अधिकार

जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांना मिळणार अधिकचे अधिकार

नवी दिल्ली : आता जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनाही दिल्लीच्या उप राज्यपालांसारखे अधिकचे प्रशासकीय अधिकार मिळणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायद्यात सुधारणा केली आहे. यामुळे आता जम्मू आणि काश्मीरमध्येही सरकार उप राज्यपालांच्या परवानगीशिवाय बदल्या आणि पोस्टिंग करू शकणार नाही.गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५५ अंतर्गत सुधारित नियम अधिसूचित केले आहेत,

ज्यामध्ये उपराज्यपालांना अधिकचे अधिकार देणारे नवीन कलम समाविष्ट केले गेले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जेंव्हा जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होतील तेव्हा राज्यातील सरकार पेक्षा जास्त अधिकार उपराज्यपालांना असतील. हे अधिकार दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या अधिकारासारखेच असतील. दरम्यान, दिल्लीमध्ये याच कारणामुळे उपराज्यपाल आणि दिल्ली सरकारमध्ये नेहमी वाद पहावयास मिळतात. भाजला असून त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सासाराम सदर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR