38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरआंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे सोन्याचे बाजारभाव वाढणार

आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे सोन्याचे बाजारभाव वाढणार

सोलापूर : जगातील अस्थिरतेसोबत जागतिक अर्थव्यवहाराचे प्रतीक असलेले सोन्याचे भाव कमी होण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यताच अधिक होऊ लागली आहे. सोन्याचे भाव ९० हजाराचा आकडा काही दिवसात गाठेल असा अंदाज समोर येऊ लागला आहे. सोन्याच्या भावाने मागील काही दिवसात कहर केला आहे. इराण व इराकच्या संबंधातील स्थिती युद्धजन्य होईल ही एक शक्यता वाढली आहे.

त्यासोबत इतर अनेक कारणाचा ऊहापोह होऊ लागला आहे. अचानक सोन्याच्या भावाने चक्क ७४ हजाराची उसळी घेतली. या प्रकाराने सोन्याचे व्यापारी देखील अचंबित झाले. हा प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सट्टेबहाद्दर व बिग बुल्सनी खेळलेला मोठा खेळच होता याचा अंदाज व्यापा-यांना आला. या प्रकारानंतर गुंतवणुकीत फायदा होईल या आशेवर असलेल्या गुंतवणूकदारांनी बॅकफुटवर जाणे पसंत केले. त्यानंतर चोवीस तासात सोन्याचे भाव पुन्हा एक हजार रुपयांनी कमी झाले. दीर्घकाळ भाव वाढते राहण्याचा अंदाज देखील समोर येऊ लागला आहे.

युद्धजन्य स्थितीसोबत चीनच्या राष्ट्रीय बँकेकडून परिस्थिती हाताळण्यासाठी झालेली वाढलेली सोने खरेदी हे एक कारण बनले आहे. आता गोल्ड मन सारख्या संकेतस्थळाने सोन्याचे भाव ८५ हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भावबदलाप्रमाणे सोन्याचे भाव वाढतेच राहणार आहेत असा अंदाज आहे. सोन्याचे भाव ९० हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात असे मानले जाते. इराण-ईराकचे मतभेद, चीनच्या राष्ट्रीय बँकेची वाढती सोने खरेदी, अमेरिकेत व्याज दर न वाढणे ही कारणे सोने बाजाराला प्रभावित करणारी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR