निवृत्तीनंतर आत्मिक समाधानाची गरज : भास्करराव कुलकर्णी

सेलू : प्रत्येक माणसाच्या जीवनात कौटुंबिक व भौतिक गोष्टींमुळे आनंद मिळतो. मात्र संसारिक जीवनाचे सार दु:खदायकच आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला आत्मिक आनंद व समाधान मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी मसलेकर यांनी केले आहे.

येथील पेन्शनर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने आयोजित दसरा स्नेह मिलाप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून दि. २२ आक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी, गौतम सूर्यवंशी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीपादराव दिग्रसकर, रामचंद्र सुभेदार, ए. टी. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले की, जीवनात प्रत्येक जण कष्ट करतो. आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. पेन्शनर्स असोसिएशन प्रत्येक निवृत्त व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासह सहलीच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद देखील देण्याचा प्रयत्न करते असल्यामुळे या संघटनेचे काम खूप मोलाचे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिग्रसकर यांनी आपण कोणत्याही ठिकाणी कार्य करत असताना, निवृत्त धारकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. रवी मुळावेकर यांनी महा उपलब्धी अ‍ॅप संबंधित माहिती सर्व निवृत्तीधारकांना देऊन हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये सामाविष्ट करण्याचा आग्रह धरला. अध्यक्षीय समारोपत डॉ. शरद कुलकर्णी यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सर्व निवृत्त धारकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो. पेन्शन भवन हे आनंद भवन ठरावे यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करतो असे सांगितले. सूत्रसंचालन ए .टी देशमुख यांनी, तर गौतम सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59
Video thumbnail
Latur Tur Price: तुरीला 10,871 रुपये क्विंटलचा विक्रमी भाव! दुष्काळामुळे आवक घटली
03:04
Video thumbnail
Exclusive Interview|प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांचा जीवनप्रवास! लहानपणापासून मानवता तीर्थपर्यंतचा प्रवास
08:40
Video thumbnail
Latur District Bank Election: मतदार अपहरण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
03:42
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
01:02:37
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२६ सहकार पॅनल
21:37
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36

Latest news