27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरजिल्ह्याजिल्ह्यांत पसरलंय ‘नीट’चे ‘नेट’; आरोपी शिक्षकांची कबुली

जिल्ह्याजिल्ह्यांत पसरलंय ‘नीट’चे ‘नेट’; आरोपी शिक्षकांची कबुली

लातूर : प्रतिनिधी
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. त्यानंतर उघडकीस आलेल्या लातूरमधील रॅकेटने तर महाराष्ट्राची झोपच उडवली आहे. लातुरात जिल्हा परिषदेचे दोन आरोपी शिक्षक नीट पेपरफुटीचे रॅकेट चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्यासाठी पैसे उकळल्याची धक्कादायक माहिती दोन आरोपी शिक्षकांनी पोलिस चौकशीत दिली असल्याची माहिती मिळाली. आरोपी शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिस आतापर्यंत २८ लोकांपर्यंत पोहोचले आहेत.

दरम्यान, नीट प्रकरणात दिवसागणित अनेक नवनवीन धक्कादायक आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. अशातच आता या प्रकरणात आणखी एक खळबळ माजवणारा खुलासा दोन आरोपी शिक्षकांनी केला आहे. आरोपी शिक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिस आतापर्यंत २८ लोकांपर्यंत पोहोचले आहेत.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचे आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी ४ ते ५ लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलिस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली. या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सबएजंट कार्यरत असल्याची कबुलीही आरोपी शिक्षकांनी दिली आहे. यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिलेले असल्याचा खुलासा झाला आहे.

पोलिस कोठडीत असलेला जलील पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची बरीच माहिती पोलिसांना दिली. गेल्या ३ ते ४ वर्षांत पठाण आणि जाधवसारखे अनेक एजंट लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातही कार्यरत आहेत. त्यांनी जे पैसे जमा केले, त्या विद्यार्थ्यांचे गुणही वाढवून देण्यात आल्याचा दावा या दोघांनी केला आहे.

इतकंच नव्हे तर इतर सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेतही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी शिक्षक जाधव आणि पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते दिल्लीपर्यंत पोहोचवणारा उमरगा, आयटीआयमधील सुपरवायझर इरन्ना कोंगलवार आणि दिल्लीतील एजंट गंगाधर हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. गंगाधर हा मूळचा मराठवाड्याचा असून उत्तराखंडमध्ये लपून बसला आहे.

इरान्ना कोंगलवार बायको-लेकरांसह फरार
नीटचे लातूर जिल्ह्यातील कनेक्शन उघड झाल्यानंतर आता सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात नीट प्रकरणाचे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी धाराशिव जिल्ह्याच्या उमरग्यातील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले असून आरोपी इरान्ना कोंगलवार बायको-लेकरांसह फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर आणखी एक आरोपी गंगाधर याचा शोध पोलिस घेत आहेत.

इरान्ना कोंगलवार, गंगाधर यांचा शोध सुरू
या प्रकरणातील फरार आरोपी इरान्ना कोंगलवार हा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआयमध्ये नोकरी करतो. मात्र, तो मागील अनेक वर्षांपासून लातूर शहरातील औसा रोड भागात राहत आहे. शनिवारपासून त्याच्या घराला कुलूप असून पत्नी आणि तीन मुलांना घेऊन तो बेपत्ता झाला आहे. त्यामुळे, पोलिस आरोपी इरान्ना कोंगलवारचा शोध घेत आहेत.

पोलिस पथक उत्तराखंडला रवाना
पोलिस आरोपी इरान्नाच्या मागावर असून फरार आरोपींना शोधण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. लातूर पोलिसांचे एक पथक उत्तराखंड भागात रवाना झाले असून उत्तराखंड भागात पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. गंगाधर आणि इरान्ना कोंगलवार हे फरार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR