26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरमहिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली

सोलापूर : राज्य शासनाने महिला प्रवाशांना महिला दिनानिमित्त प्रवासात अर्धे तिकीट घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी एसटीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. सोलापूर आगारातून महिन्याकाठी जवळपास सहा लाख प्रवासी विविध प्रवास सवलतींचा लाभ घेत आहेत. यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पूर्वी एसटी सेवा ही तोट्यात धावत होती असे प्रशासनाकडून सांगितले जात होते; पण महिला दिनापासून महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. यापोटी महिन्याकाठी जवळपास एक सव्वा कोटीचे विविध अनुदान मिळण्यासाठी एका डेपोतून मागणी केली जाते. ही सवलतीची रक्कम शासनाकडून वेळोवेळी मिळण्यासाठी उशीर होत आहे, जर ही लवकर मिळाल्यास एसटीवरील ताण कमी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एसटी प्रशासनाकडून सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करतात. यामुळे सगळ्याच प्रवाशांना याची सोय होते. अशाच प्रकारे दिवाळीमध्येही जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या काळात महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रवास केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सवलत योजनेच्या रकमेमुळे महामंडळाच्या तिजोरीत भर पडत आहे; मात्र मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून सवलत रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असल्याचे शासनाकडन देण्यात आलेल्या सांगण्यात आले.एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ दररोज हजारो प्रवाशांकडून घेतला जातो. यात महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, अपंग, वारीतील मानकरी आदींसाठी विविध योजनेतून लाभ दिले जातात. जवळपास ४० प्रकारच्या सवलती एसटी प्रशासनाकडून दिल्या जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR