28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयसुपरस्टार विजयच्या पक्षाच्या पदाधिका-यांची सोमवारी बैठक

सुपरस्टार विजयच्या पक्षाच्या पदाधिका-यांची सोमवारी बैठक

चेन्नई : तमिळ सुपरस्टार विजयने २ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘ तमिझगा वेत्री कळघम ’ तमिझगा वेत्री कळघम (टीव्हीके) या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. विजयच्या पक्षाचे लक्ष्य येणा-या लोकसभा निवडणुक लढण्याचे नसून , २०२६ ची विधानसभा निवडणुक लढण्याचे आहे. विजयच्या कार्यालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की टीव्हीके १९ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी पनीयुर येथील पक्षाच्या मुख्यालयात सकाळी ९ वाजता आपल्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहे.

या बैठकीत पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आणि राज्याचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत काही निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत.सुत्राच्या मते विजय लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊ शकतो असे बोलले जात आहे.

मात्र, विजयने याबद्दल कोणतेही भूमीका स्पष्ट केली नाही. तामिळनाडूतील दोन माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) आणि जे. जयललिता तमिळ जगतातील सुपरस्टार होत्या. यासोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी हे तमिळ चित्रपट उद्योगातील आघाडीचे पटकथा लेखकांपैकी एक होते. आता सुपरस्टार विजयनेही राजकारनात इन्ट्री केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR