27.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रजालन्याच्या ओबीसी मेळाव्याला जाण्यास पक्षाने परवानगी दिली नाही

जालन्याच्या ओबीसी मेळाव्याला जाण्यास पक्षाने परवानगी दिली नाही

पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य

जालना : ओबीसी समाजाचा जालन्यातील अंबड तालुक्यात मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रत्येक पक्षाचे ओबीसी नेते आले होते. पंकजा मुंडे या मेळाव्यात येतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते अखेर पंकजा मुंडे यांनी त्यामागील कारण सांगितले. मेळाव्याला जाण्यासाठी माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही असे त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती होती. पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीनंतर त्यावरून चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. त्यानंतर याच विषयावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी जायला माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर या सभेमध्ये छगन भुजबळ यांचं प्रमुख भाषण होणार होतं आणि त्यावर त्यांनी आपली ओबीसी आरक्षणावरची भूमिका मांडली असल्याचा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दोन जातींमध्ये कधीही भिंत उभी केली नाही
ओबीसीची जनगणना व्हावी अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती आणि या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले होते असे सांगत पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या मार्गावरच मी सध्या काम करत असून माझे राजकारण हे गरिबांसाठी आणि वंचितांसाठी आहे. मी दोन जातींमध्ये कधीच भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. मला ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आमंत्रणाची गरज नसून मी बहुजनांच्या बाजूने आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR