38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा-ओबीसी संघर्ष पेटला!

मराठा-ओबीसी संघर्ष पेटला!

स्वराज्य संघटनेच्या पदाधिका-याने भुजबळांना सुनावले

पुणे : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात संघर्ष पेटत आहे. यादरम्या स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी शासकिय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळ यांना सुनावले आहे. स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांचा इशाराच आहे. चिथावणी देऊन ओबीसीचा वाद लावला जात आहे. भुजबळ साहेब थोडे सबुरीने घ्या. वेळ पडली तर भुजबळांची गाडी इथेही फोडू शकतो असे विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान या इशा-यानंतर ओबीसी समाजातील बांधव आक्रमक झाले असून आमच्या दैवताला जर कोणी इशारा देत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशी भावन देखील व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिका-यांबरोबर बैठक सुरू असताना अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत होते मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना आव्हान दिले. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली. तसेच गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसे सोडले असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिका-यांनी पोलिसांना उपस्थित केला. जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.

चिथावणी देऊन ओबीसी-मराठा वाद पेटवला जात आहे. तुम्ही पाहू शकता येथे माझ्या समोर भुजबळांची गाडी आहे. वेळ पडली तर ती फोडून त्यांचा निषेध केला जाऊ शकतो. ओबीसीच्या नेत्यांना विनंती आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका. अन्यथा या गोष्टी हताबाहेर जातील. विनंती आहेआमच्या लेकराबाळांना मिळणा-या आरक्षणाच्या आड येऊ नका. हात जोडून विनंती आहे भुजबळ साहेब सबुरीने घ्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR