मुंबई : भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये प्रवाशांच्या गर्दीच्या कहाण्या आपण ऐकतो, त्याचे फोटो आणि व्हीडीओ हे नेहमीच पाहतो. पण रेल्वेची ही स्थिती विमानामध्ये आली तर? विमानामध्ये तसे काही होत नाही असा जर तुमचा समज असेल तर तो इंडिगोच्या फ्लाईटने चुकीचा ठरवला आहे. मुंबईहून वाराणसीला जाणा-या विमानात एक प्रवासी उभा होता, त्याला जागा मिळाली नव्हती. अशाही स्थितीत त्या विमानाने उड्डाण घेतल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी मुंबईहून वाराणसीला जाणा-या इंडिगोच्या विमानात हे चित्र पाहायला मिळाले. इंडिगोच्या या विमानाचे ओव्हरबुकिंग असल्याने एक प्रवासी फ्लाईटच्या मागच्या बाजूला उभा होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे विमानानेही योग्य प्रकारे उड्डाण केले होते. मात्र नंतर विमान पुन्हा विमानतळावर उतरवण्यात आले. प्रवासी विमानाच्या मागे उभा होता. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून वाराणसीला जाणा-या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये क्रू मेंबरला एक व्यक्ती विमानाच्या शेवटी उभी असल्याचे दिसले. तोपर्यंत विमान टेक ऑफ करणार होते.
क्रू मेंबरने त्या ठिकाणी प्रवासी उभा असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली. यानंतर विमान पुन्हा टर्मिनलवर आणण्यात आले. मात्र यासंदर्भात एअरलाइन्सकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. सामान्यत: एअरलाईन्स रिकाम्या जाऊ नयेत म्हणून कंपन्यांकडून फ्लाईट ओव्हरबुक केली जाते.
विमान टर्मिनलवर परत आणले
विमान टर्मिनलवर परत आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले. विमान कंपन्यांकडून प्रत्येकाच्या केबिनचे सामान तपासले गेले आणि विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले. २०१६ मध्ये डीजीसीएमने जारी केलेल्या नियमांनुसार, विमानाने उड्डाण केल्यानंतर एका तासाच्या आत प्रवाशाला दुसरे विमान उपलब्ध करून दिल्यास त्या प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.