25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयआंदोलन करणा-या शेतक-यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द

आंदोलन करणा-या शेतक-यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द

नवी दिल्ली : दिल्लीकडे कूच करणारे आणि सध्या शंभू बॉर्डवर आंदोलन करत असलेल्या शेतक-यांना हरयाणा पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणा-या शेतक-यांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ज्या शेतक-यांनी हिंसाचारात सहभाग घेतला त्या शेतक-यांचे फोटो अंबाला पोलिसांनी मीडियाला दिले आहेत. तसेच या शेतक-यांविरोधात कडक पावले उचलणार असल्याचेही सांगितले. पोलिसांनी असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यातील शेतक-यांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पिकांना किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी हरयाणाच्या शेतक-यांनी दिल्ली चलो आंदोलनाची हाक दिली होती. त्यासाठी गेल्या पंधरादिवसांपासून शंभू बॉर्डरवर आंदोलन करत आहेत.

आतापर्यंत या शेतक-यांच्या सरकारच्या प्रतिनिधींसोबत अनेकदा चर्चा झाल्या पण या चर्चांमधून ठोस असा कुठलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, या शेतक-यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स, खिळ्याचे आणि ता-याचे कुंपण तसेच अश्रुधुरांच्या नळकांड्या, पाण्याचे कँन्टर यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे या शेतक-याने दिल्ली शहरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले तरीही अद्यापही शेतक-यांचे आंदोलन सुरुच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR