लंडन : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याचा हा मार्ग आणखी सुकर केला आहे. सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची संधी साधण्यासाठी जो रूटला आणखी वेळ मिळाला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केंद्रीय कराराबाबत नुकतीच मोठी घोषणा केली. साधारणपणे क्रिकेट बोर्ड खेळाडूंसोबत एका वर्षाचा करार करतात. मात्र, ईसीबी ने जो रूटसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर जो रूटकडे इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कर्णधार म्हणून ही त्याची दुसरी कारकीर्द आहे. भविष्यातही तो हे पद कायम राखण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास रूट सप्टेंबर २०२८ पर्यंत इंग्लंडकडून खेळताना दिसू शकतो.
क्रिकेट जगतातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामन्यांत १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला जो रुट असा एकमेव फलंदाज आहे जो हा विश्वविक्रम मोडू शकतो. रुटने आतापर्यंत १६९ कसोटी सामन्यांत १४,२७८ धावा केल्या आहेत. तो सचिनपेक्षा १,६४३ धावांनी मागे आहे. पुढील दोन वर्षांत १,६४४ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करत तो सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विश्वविक्रम मोडू शकतो.
















