23.4 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeसोलापूरकुणाच्या पिलावळीनं सोलापुरात दंगली घडवल्या, हे सोलापूरकरांना चांगलेच माहिती : सचीन कल्याणशेट्टी

कुणाच्या पिलावळीनं सोलापुरात दंगली घडवल्या, हे सोलापूरकरांना चांगलेच माहिती : सचीन कल्याणशेट्टी

सोलापूर : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना ‘मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा सोलापुरात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता’ असा खळबळजनक आरोप केला होता. खासदार शिंदेंच्या त्या आरोपाला भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सडेतोड उत्तर देताना ‘दंगलींचा विषय काढायचा झाला तर गोष्ट खूप लांबपर्यंत जाईल. बोलताना शब्द जपून वापरा; अन्यथा आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल’ असा इशाराही दिला आहे.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, कोणाची सत्ता असताना सोलापूरमध्ये दंगली घडल्या आहेत, हे प्रणिती शिंदे सोयीस्करपणे विसरत आहेत. कुणाच्या पिलावळीनं सोलापुरात दंगली घडवल्या, हेदेखील सोलापूरकरांना चांगलेच माहिती आहे.त्यामुळे दंगलींबाबतचा विषय काढायचा झाला तर गोष्टी खूप लांबपर्यंत जातील.

प्रणिती शिंदे ह्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर विकासाबद्दल न बोलता, लोकांना जाती- पाती धर्मांमध्ये अडकून भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मुद्याचं बोला म्हणणाऱ्या प्रणिती शिंदे आता तुम्ही मुद्द्याचं बोला, असे आवाहनही कल्याणशेट्टी यांनी प्रणिती शिंदे यांना केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना तुम्ही आमची लाज काढता. प्रणिती शिंदे, आपण खासदार आहात, तेव्हा शब्द जपून वापरा. आम्ही बोलायला लागलो, तर खूप महागात पडेल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम आहे, त्यांच्या कालावधीत एकही दंगल सोलापुरात घडली नाही.

सर्व अप्रिय घटना काँग्रेसच्या काळात घडल्या आहेत. या उलट सोलापूर शांततेत ठेवण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे, असा दावाही सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.सोलापूर लोकसभेची निवडणूक भाजपच्या हातातून गेलेली आहे, असे भाजप नेत्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर भाजपच्या लोकांनी आता एकच उपाय आहे, सोलापूरमध्ये दंगली घडवा. लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या, असं स्थानिक नेत्यांना सांगण्यात आलं होतं. त्यासाठी तुम्ही भाजप नेत्यांची मतदानाच्या आधीची पाच दिवसांची भाषणं बघा. त्यात तुम्हाला पुरावा मिळेल, ते कशी लावालावी करत होते, असा गौप्यस्फोट प्रणिती शिंदे यांनी केला होता.त्याला कल्याणशेट्टी यांनी प्रत्युत्तर दीले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR