22 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात नवमतदारांचा टक्का वाढला

परभणी जिल्ह्यात नवमतदारांचा टक्का वाढला

परभणी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात मतदार याद्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील ९ हजार ९५१ मतदारांची नव्याने भर पडली आहे. प्रारूप मतदार यांदीत १८ ते १९ वयोगटातील मतदार संख ८, ०६२ होती ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीमध्ये १८,०१३ इतकी झाली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या ३,१०,५७० होती. अंतीम यादीत ती ३,१९,६८९ एवढी झाली आहे. त्यामुळे एकंदरच अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का वाढला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षित पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४च्या विशेष संक्षित पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादीत २८,३७० मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २५,१९९ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ३,१७१ मतदारांची निव्वळ वाढ होवून एकुण मतदारांची संख्या १४,८२,३६५ इतकी झाली आहे. त्यानुसार ४०१ पुरूष मतदारांची २,७७० स्त्री मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री पुरूष गुणोत्तर ९२३ वरून ९२६ इतके झाले आहे.

दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जावून यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पहावे. सोबतच मतदान केंद्र सुध्दा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन वेळी मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच मतदाता सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाईन अ‍ॅप यावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अशी आहे मतदारसंघ निहाय मतदार संख्या
परभणी जिल्ह्यातील एकुण मतदार संख्या १४,८२,३६५ असून यात पुरूष मतदार ७,६९,६३२ तर स्त्री मतदार संख्या ७,१२,७०८ एवढी आहे. यामध्ये परभणी मतदार संघात पुरूष १,७०,०२५ तर स्त्री १,५९,२१० असे एकुण ३,२९,२४३ मतदार संख्या आहे. जिंतूर मतदार संघात पुरूष १,९२,११२ तर स्त्री १,७८,२६५ असे एकुण ३,७०,३८८ मतदार आहेत. पाथरी मतदार संघात पुरूष १,९५,६४२ तर स्त्री १,८०,४९० असे एकुण ३,७६,१३३ मतदार संख्या झाली आहे. गंगाखेड तालुक्यात पुरूष २,११,८५३ तर स्त्री १,९४,७४३ असेण एकुण ४,०६,६०१ मतदार संख्या झाली आहे. यामध्ये गंगाखेडमध्ये सर्वाधिक मतदार संख्या आहेत. त्या पाठोपाठ पाथरी दुस-या तर जिंतूर मतदार संघ तिस-या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात परभणी मतदार संघात सर्वात कमी मतदार आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR