21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगलादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच

बांगलादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच

पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार ३०० पैकी २२४ जागा जिंकल्या

नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पाचव्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विरोध पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या निवडणुकीत शेख हसीना यांच्या पक्षाला ३०० पैकी २०० जागांवर विजय मिळाला. तर शेख हसीना स्वत: २ लाख ४९ हजार ४९६ मतांनी विजय मिळवला आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पाचव्यांदा शेख हसीना पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने ३०० जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. २००९ पासून बांगलादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच आहे. त्यापूर्वी १९९१ ते १९९६ या काळात शेख हसीना पंतप्रधान होत्या. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने ३०० संसदीय जागांपैकी २२४ जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षानं चार जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी ६२ जागा जिंकल्या आहेत, तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित दोन जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.

हसीना आठव्यांदा जिंकल्या
शेख हसीना त्यांचा लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-३ मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना २,४९,९६५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी ४६९ मते मिळाली. शेख हसीना १९८६ पासून आठव्यांदा गोपालगंज-३ मधून निवडणूक जिंकल्या आहेत. दरम्यान, शेख हसीना बांग्लादेशमध्ये सर्वाधिक काळापासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR