रेणापूर : प्रतिनिधी
लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग वरील ंिपपळ फाटा रेणापूर येथे शुक्रवारी दि .२२ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता होणा-या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी अंतीम टप्यात आली असून ंिपपळ फाटानजीक ४० एकरवर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. सभेसाठी जवळपास दीड ते दोन लाख समाज बांधव सभेला उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सभेच्या व्यवस्थेसाठी १००० ते १५०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. सभा स्थळापासून १ ते २ किमी रेणापूरच्या चारही बाजूंनी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. या सभेसाठी तालुक्यासह लातूर, अंबाजोगाई अहमदपूर, चाकूर, उदगीर तालुक्यातील मराठा बांधव या सभेसाठी उपस्थिती लावणार आहेत. नियोजनासाठी संपर्क व प्रचार कमिटी, सभामंडप व डेकोरेशन कमिटी, स्वयंसेवक आयोजन कमिटी, खर्च व व्यवस्थापन समिती अशा वेगवेगळ्या समित्या करून अतिशय नियोजन सुव्यवस्थेत पद्धतीत करण्यात आले आहे.
सभेच्या दिवशी पांिर्कंगच्या ठिकाणी आयोजकाच्या वतीने नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच महिलांसाठी सभेच्या ठिकाणी वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात येऊन शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सभास्थळी, वयोवृद्ध व अपंगाना येण्यासाठी रेणापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेणे-आणण्याची टेम्पो- ट्रॅव्हल्सची सोय करण्यात आली आहे. अरोग्याच्या दृष्टीने सभास्थळी उपचारांचा व्यवस्था करण्यात येणार आहे. शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी होणा-या सभेची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.