21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरउसावरील लोकरी माव्याचे शेतक-यांपुढे संकट

उसावरील लोकरी माव्याचे शेतक-यांपुढे संकट

वाढत्या हुमनीचाही ऊस पिकाला फटका

पंढरपूर : अवकाळीमुळे शेतक-यांच्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता ऊस या शेती पिकालाही लोकरी माव्याचा फटका बसत आहे. रातोरात उसाचे प्लॉट लोकरी माव्याला बळी पडत आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सोलापूर जिल्हा हा साखर पट्टा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. भीमा, सीना, माण नदीकाठ उसाने बहरला आहे. उजनी डावा व उजवा कालवा तसेच नीरा उजवा कालव्यातून येणा-या पाण्यामुळे उसशेती मोठ्या प्रमाणात फुलली आहे. वाढते उसाचे क्षेत्र लक्षात घेऊन साखर कारखानदारीदेखील या पट्टयात उदयास आली आहे. वेळेत ऊस कारखान्याला गाळप होत असल्याने व हमीदर मिळत असल्याने शेतकरी ऊस शेती करत आहेत.

उसशेतीसाठी मजूर कमी लागत असून उत्पादन खर्चदेखील शेतक-यांच्या बजेटमध्ये असल्याने शेतक-यांना उसशेती फायद्याची ठरत आहे. ऊस हे पीक रोगराईला जास्त करून बळी पडत नाही. जास्त पाणी या पिकाला फायदेशीर ठरत आहे. पावसाळ्यात उसाची माठी वाढ होते. एकरी ६० ते ७० टन सरारी उत्पादन निघाले तरी दीड लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळते. उसाचे वाढते क्षेत्र असल्याने ऊस बेणे, जनावरांना चारा याकरितादेखील उसाचा वापर केला जात आहे. उसशेती शेतक-यांना फायद्याची ठरत आहे. मात्र लोकरी माव्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उसाचे प्लॉट खराब होऊ लागले आहेत.

उसाच्या बाहेरच्या बाजूला लोकरी मावा आला असेल तरच शेतक-यांच्या दृष्टीस पडतो. अन्यथा उसाच्या फडात आतील बाजूस लोकरी माव्याची लागण झाली तर लवकर शेतक-यांच्या दृष्टीस पडत नाही. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेल्या उसाच्या पानाच्या पात्यावर पांढरे डाग दिसून येतात. हेच डाग वाढत जाऊन काळे पडतात. उसाची पानेदेखील काळी पडतात व करपून जातात. पानांबरोबर ऊसदेखील वाळत असल्याने मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने हुमनीच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे सध्या उसाला मोठ्या प्रमाणात हुमनी लागली असल्याने ऊसाचे फडच्या फड पिवळे पडू लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR