मुंबई : काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली. जखमींवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्य सरकारवर टीका केली.
कालची घटना निषेधार्य आहे. सरकार आणि गुंडांच्यामध्ये अंतर कमी झाले आहे. गुंडगीरीला प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदारच तसं सांगत आहेत. गोळ्या झाडल्याचे ते आमदाराच सांगत आहेत. पोलीस ठाण्यातच असा गोळीबार होतोय म्हणजे कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली आहे, असं सध्या महाराष्ट्र चित्र आहे. अशी घटना आपल्या राज्यात आजपर्यंत कधी झालेली नव्हती ती आज झाली आहे, असा टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला.