22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी रंगभूमीचे प्रश्न लवकरच सोडविणार

मराठी रंगभूमीचे प्रश्न लवकरच सोडविणार

पुणे : प्रतिनिधी
मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि खासदार शरद पवार,खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी,नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले,नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे.

मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून ते म्हणाले, १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य गृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे.

खासदार पवार म्हणाले, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे.नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे.मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, प्रशांत दामले यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणा-यानाआभार मानले वामन पंडित संपादीत ‘रंगवाचा’ नियतकालिकाचे आणि १०० मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ंिपपरीचिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नांदी’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन ‘रंग निरंतर’चे प्रकाशन ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR