28.7 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeधाराशिवपत्रास कारण की........

पत्रास कारण की……..

कळंब : सतीश टोणगे

माननीय मुख्यमंत्री, सप्रेम नमस्कार… लोकसभा संपली आता विधान सभेची निवडणूक लागेल, कोणते मुद्दे घेऊन आपण मतदारा पुढे जाणार आहात. सध्या राज्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही… सकाळी झोपेतून उठल्यानंतर नवीन काहीतरी ऐकायला मिळते. सध्या राज्यात कोणाचाच कोणावर अंकुश नाही. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अधिका-यावर नियमबा कामे करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. साहेब…. आपल्या सहका-यांची मनमानी चालू आहे, राज्यातील महत्त्वाचा असलेला आरोग्य विभाग सलाईन वर आहे. पुण्यात रक्ताचे नमुने बदलण्याचे धाडस डॉक्टर कुणाच्या बळावर करतात.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर डॉक्टर पवार यांनी पत्र पाठवून कारनामे उघड केले आहेत, हे जर पत्र खरे असेल तर आपण कारवाई करणार काय..? अशी कुजबूज राज्यभर होऊ लागली आहे. आपण साहेब पाठीशी घालू नका… मंत्र्यांची तक्रार ही काही पहिल्यांदाच झाली नाही यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, गो.रा. खैरनार, पन्नालालजी सुरणा, एन. डी .पाटील, गणपतराव देशमुख आदींनी मंत्री, अधिकारी यांच्या तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन अनेकांना पायउतार व्हावे लागले होते. राज्यात काही विपरीत घटना घडल्यास त्याची जिम्मेदारी स्वीकारून मुख्यमंत्री, मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण साहेब… आपल्या राज्यात नेहमीच विपरीत घटना घडत असतानाही त्या घटनेची कोणीही जिम्मेदारी घेत नाही व खुर्ची कुणी सोडायला तयार नाहीत, चिटकून बसल्याची कुजबूज होऊ लागले आहे. मुख्यमंत्री साहेब… हे बरोबर नाही तुमच्या राज्यात जेवढ्या जास्त घटना घडतील, तक्रारी होतील तेवढे मंत्री, पालकमंत्री, लोकप्रिय आहेत असा आपला समज झाला आहे.

आरोग्यमंत्री हे सतत काही ना काही तरी नवीन शोधत असतात, मागे खेकड्यांचा शोध त्यांनीच लावला होता. कुठलेही आरोप करण्यास त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांच्यावर डॉक्टर पवार यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तरच आपली विश्वासार्हता निर्माण होईल. काहीही म्हणा साहेब… आपला दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वर , सहकार्यावर व प्रशासनावर आपला वचक नाही हे मात्र खरे…..आता तक्रार करणा-यावरच मोठी कारवाई झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR