हेड-नेक कॅन्सरचा धोका ३० टक्क्यांनी वाढला

मुंबई : तोंडात किंवा घशामध्ये झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात सर्व कॅन्सर रुग्णांपैकी अंदाजे २६ % ते ३० % रुग्णांना हेड आणि नेक कॅन्सर असल्याची माहिती आहे. ज्याचे प्रमुख कारण तंबाखू, गुटखा, बीडी, सिगारेट आणि इतर सवयींशी संबंधित आहे. हे प्रमाण इतर कर्करोगांच्या तुलनेत अधिक आहे.

जागतिक आरोग्य संघटना अंतर्गत आयएआरसी ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वटरीनुसार, जगभरात सुमारे ९.३ ते ९.५ लाख नवीन हेड आणि नेक कॅन्सरची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात दरवर्षी सुमारे १० ते १२ लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळतात. यापैकी जवळपास ३० टक्के कर्करोग हे हेड अ‍ॅण्ड नेक कर्करोगाचे असतात. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, दारूचे व्यसन तसेच काही विषाणुजन्य संसर्ग ही या कॅन्सरची प्रमुख कारणं मानली जातात. विशेष म्हणजे हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेल्यास पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते.

तज्ज्ञांच्या मते, तोंडात तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम, गालाच्या आत पांढरे किंवा लाल चट्टे, पाणी किंवा पदार्थ गिळताना त्रास होणे, सतत घसा दुखणे, मानेला गाठ येणे किंवा आवाजात बदल होणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याबाबत माहिती देताना डॉ. प्रथमेश पै (प्रमुख – हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर विभाग, ग्लेनईगल्स हॉस्पीटल, मुंबई) म्हणाले, बहुतेक रुग्ण डॉक्टरांकडे येण्यास विलंब करतात. सुरुवातीच्या टप्प्यात आढळलेला हेड-नेक कॅन्सर ८० ते ९० टक्के प्रकरणांमध्ये यशस्वीरीत्या बरा होऊ शकतो. त्यामुळे तोंडातील कोणत्याही जखमेकडे दुर्लक्ष करु नका.

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल मजीद यांनी तंबाखूच्या सवयींबाबत इशारा देताना सांगितले की तंबाखू आणि दारूच्या व्यसनांमुळे हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. जनजागृती, नियमित तपासणी आणि सवयींमध्ये बदल हेच या कॅन्सरपासून संरक्षणाचे प्रभावी मार्ग आहेत.

कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो?
हेड आणि नेक कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, यासाठी योग्य जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटखा, खैनी, मावा, सुपारी, बीडी आणि सिगारेटचे सेवन हे या कॅन्सरला कारणीभूत घटक आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे हा प्रतिबंधाचा पहिला आणि प्रभावी उपाय आहे. दारूचे सेवन पूर्णपणे बंद करणे, तंबाखू आणि दारू, सुपारी यांचा एकत्रितरित्या वापर हा हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढवतो असेही डॉ. पै यांनी स्पष्ट केले.

नियमित दंत तपासणी गरजेचा
मौखिक स्वच्छता राखणे आणि नियमित दंत तपासणी करून घेणे हेही प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संतुलित आणि पोषक आहार, विशेषत: फळे व हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तोंडात किंवा घशात झालेली कोणतीही जखम, गाठ किंवा असामान्य बदल हे २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहिल. विशेषत: पुर्वी तंबाखू सेवन करत असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉ. तनवीर यांनी दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news