24.1 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीनिवास काकांची भूमिका योग्यच

श्रीनिवास काकांची भूमिका योग्यच

पुणे : प्रतिनिधी
एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, दुसरीकडे पवार कुटुंबातील वादात आणखी एक ठिणगी पडली आहे. कारण अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, यावरच आता रोहित पवारांची प्रतिक्रिया येत असून, श्रीनिवास काकांचा भूमिका योग्य आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका त्यांना महागात पडेल असे रोहित पवार म्हणाले आहेत. तर, स्वत:च्या भुमिकेमुळे दादांचे कुटुंब एकटे पडले असेही रोहित पवार म्हणाले.

श्रीनिवास पवार यांच्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, श्रीनिवास काकांचा व्हीडिओ मी पाहिला आहे. लोकांना वाटते तीच भूमिका त्यांनी घेतली आहे. दादांना त्यांनी जवळून बघितलं आहे आणि साहेबांनाही बघितलंय. श्रीनिवास पवार यांची भूमिका पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसांना पटणारी भूमिका आहे. पवार साहेब हे पवार कुटुंबीयांची ओळख आहे. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांची संस्कृती बोलून दाखवली आहे.

अजित पवार यांनी भूमिका घेतल्यावर कुटुंब म्हणून आम्हाला वाईट वाटले होते. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. पण दादांसह त्यांच्या जवळच्या पवारांनी म्हणजेच काकींनी आणि त्यांच्या दोन मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, पवार कुटुंबात १०० पेक्षा जास्त पवार आहेत, असे रोहित पवार म्हणाले.

‘दादां’चे कुटुंब एकटे पडले
मला एकटे पाडले जात असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की,ह्वअजित पवारांना एकटे पाडण्यात आले नसून, त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांचे कुटुंब एकटे पडले आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली ती साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका आहे. स्वाभिमानी नागरिकाला विचारल्यास तोही तेच बोलेल. दादांनी घेतलेली भूमिका महागात पडेल, असेही रोहित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR